
बेळगाव : शिवाजी नगरमधील तिसरा क्रॉस येथे मुत्यानत्ती येथील तरुणांच्या एका गटाने एका तरुणावर गुरुवारी जीवघेणा हल्ला केला.
हल्ल्यातील तरुणाचे नाव कुणाल लोहार (२०) असे असून शिवाजी नगर येथील तो रहिवासी आहे. कुणाल काम संपवून जेवणासाठी घरी परतत असताना मुत्यानत्ती येथील १० ते १५ तरुणांच्या गटाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
कुणालच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या कुणालवर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Belgaum Varta Belgaum Varta