
बेळगाव : कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी बेळगाव येथे प्रवेश प्रक्रिया उद्भवधन शिबिराचे आयोजन करण्याची विनंती शिवाजी विद्यापीठातर्फे महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावला करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांतर्गत दूरशिक्षण माध्यमात बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र), एम.कॉम., एम.बी.ए., एम.एस्सी. गणित (सर्टिफिकेट कोर्स) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन शिक्षण माध्यमांतर्गत एम.बी.ए., एम.कॉम., एम.एस्सी (गणित) या सर्टिफिकेट कोर्सचा समावेश आहे. सदर अभ्यासक्रम यूजीसी -डीइबी अँड एआयसीटीइ मान्यताप्राप्त असून अध्ययन व्यवस्थापनाचा वापर, 87 अभ्यास केंद्रांची सोय, तज्ज्ञांची व्याख्याने, संपर्क सत्रे व चर्चासत्रे, उच्च प्रतीचे स्वयंअध्ययन साहित्य, सवडीनुसार घर बसल्या अध्ययन व सवलतीच्या शुल्कात शिक्षण ही या अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
गेल्यावर्षी सदर विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी बेळगाव येथे प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पद्धतीने चालू शैक्षणिक वर्ष 2025 -26 साठी देखील बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.बी.ए., एम.एस्सी. गणित, एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) तसेच नव्याने सुरू केलेले एम.कॉम., एमएस्सी गणित, एम.बी.ए. (ऑनलाईन मोड) या अभ्यास केंद्रांची माहिती आपण आपल्या संबंधितांना त्यांचे अपूर्ण असणारे पदवी व पदव्युत्तर शिक्षण दुरस्त व ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता यावे यासाठी आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया उद्बोधन शिबिराचे आयोजन करावे, अशी विनंती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीला केली असून तशा आशयाचे पत्र समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांना धाडले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta