Saturday , November 7 2026
Breaking News

पावसामुळे सौंदत्ती यल्लम्मा मंदिरातील हुंडीतील ओल्या झालेल्या नोटा उन्हात वाळवल्या!

Spread the love

 

सौंदत्ती : सौंदत्ती यल्लम्मा मंदिर परिसरात पावसाने थैमान घातले.  मंदिरात पाणी शिरले, त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासह मंदिरातील दानपेट्यांमध्येही पाणी साचले. यामुळे हुंडीतील नोटा आणि नाणी पूर्णपणे भिजून गेली.

मंगळवारी दानपेटी उघडून त्यातील पाणी काढण्यात आले. देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांनी भिजलेल्या नोटा व नाणी वेगळ्या करून, धान्य वाळवण्याप्रमाणे मंदिराच्या आवारात उन्हात वाळत घालण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच मंदिर परिसराची स्वच्छता करून नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे.

या संदर्भात श्री यल्लम्मा देवस्थान प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले की, “पाणी ओसरल्यानंतर मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून भक्तांसाठी सर्व सुविधा पूर्ववत सुरू आहेत.”

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *