सौंदत्ती : सौंदत्ती यल्लम्मा मंदिर परिसरात पावसाने थैमान घातले. मंदिरात पाणी शिरले, त्यामुळे देवीच्या गाभाऱ्यासह मंदिरातील दानपेट्यांमध्येही पाणी साचले. यामुळे हुंडीतील नोटा आणि नाणी पूर्णपणे भिजून गेली.
मंगळवारी दानपेटी उघडून त्यातील पाणी काढण्यात आले. देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांनी भिजलेल्या नोटा व नाणी वेगळ्या करून, धान्य वाळवण्याप्रमाणे मंदिराच्या आवारात उन्हात वाळत घालण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच मंदिर परिसराची स्वच्छता करून नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्यात आली आहे.
या संदर्भात श्री यल्लम्मा देवस्थान प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले की, “पाणी ओसरल्यानंतर मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून भक्तांसाठी सर्व सुविधा पूर्ववत सुरू आहेत.”

Belgaum Varta Belgaum Varta