बेळगाव : गेल्या तीन-चार वर्षांपासून गणेश विसर्जनाला 36 तासाहून अधिक काळ लागत आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून यंदाच्या वर्षी तो विलंब कसा कमी करावा यासंदर्भात पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पाहणी दौरा केला. सर्वप्रथम कपिलेश्वर तलाव येथे पाहणी करून संभाजी उद्यान पासून त्यानंतर कपिलेश्वर कॉलनी पासून पुन्हा कपिलेश्वर तलाव पर्यंत पाहणी केली. त्यानंतर वडगाव कृत्रिम तलावाची पाहणी केली. त्यानंतर हिंडलगा गणपतीच्या समोरील तलावाची सुद्धा पाहणी केली. पाहणी दरम्यान या परिसरातील अडचणी आणि तेथील विविध सुविधांची प्रत्यक्षात जाऊन त्याची माहिती घेतली.
या पाहणीदरम्यान पोलिस आयुक्तांसोबत जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सतीश गोरगोंडा, आनंद आपटेकर, एसपीएम रोड गणेश मंडळाचे पदाधिकारी अशोक हलगेकर, वाहतूक विभागाचे एसीपी ज्योतिबा निकम आणि दक्षिण वाहतूक पोलीस निरीक्षक बसनगौडा पाटील, हेस्कॉम सेक्शन ऑफिसर गलगली अधिकारी व परलाद बेलीकटी अधिकारी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाकडून मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि वेळेवर विसर्जनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक वेळेत व सुरक्षितरीत्या पार पडावी, यासाठी पोलिस विभाग सज्ज असल्याचे आयुक्त भूषण बोरसे यांनी यावेळी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta