Thursday , March 5 2026
Breaking News

मंत्री के. एन. राजण्णांना मंत्रिमंडळातून वगळल्याचा बेळगाव जिल्हा वाल्मीकी समाजाच्यावतीने निषेध

Spread the love

 

बेळगाव : उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या सांगण्यावरून काँग्रेस हायकमांडने मधुगिरीचे आमदार के. एन. राजण्णा यांना मंत्रिमंडळातून अचानक वगळले, हा प्रकार निषेधार्ह आहे, असे बेळगाव जिल्हा वाल्मीकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार म्हणाले.
बुधवारी बेळगावमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, “तुमकूर जिल्ह्यात आपला मोठा प्रभाव असलेले आणि ‘तुमकूरचे देवराज अर्स’ म्हणून प्रसिद्ध असलेले राजण्णा यांची प्रगती सहन न करणाऱ्या काही लोकांनी आणि ‘मीर सादिकांना’ राजण्णा यांना या पातळीवर वाढलेले पाहवले नाही. त्यामुळे अज्ञात शक्तींच्या दबावाखाली हायकमांडने त्यांना मंत्रिमंडळातून वगळले आहे, जो अहिंद (अल्पसंख्याक, हिंदू, दलित) समाजाचा अपमान आहे राजण्णा यांनी हासन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नगरपालिकेला महानगरपालिका बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. ३० वर्षांनंतर लोकसभेचे खासदार निवडून आणले आणि अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना बोलावून हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन केले. तरीही त्यांनाच बळीचा बकरा का बनवले, याचे उत्तर समाजाने मागितले पाहिजे.“सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संधीसाधू लोकांनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना लक्ष्य करणे सुरू केले आहे, हे कर्नाटकचे लोक पाहत आहेत. याचे उत्तर त्यांना येत्या काळात मिळेल. राज्यातील एसटी समाजातील तीन मंत्र्यांपैकी दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. हा वाल्मीकी समाजावर मोठा अन्याय आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे,” असे तळवार म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *