बेळगाव : ‘आय लव लिझार्ड’ राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी गोवर्धन अशोक पाटील हा विजेता ठरला आहे. सहा ते दहा वर्षे वयोगटाच्या स्पर्धेत त्याने हे यश संपादन केले आहे. आकर्षक बक्षीस, वन्यजीवविषयक पुस्तक, भेटवस्तू असे बक्षिसाचे स्वरूप आहे. देशातून ठिकठिकाणी भागातील जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटातून भाग घेतला होता. पालीबद्दल मुलांमधील भीती कमी करणे, पाली किंवा सरड्याच्या वेगवेगळ्या जाती विद्यार्थी अभ्यासणे, पाली किंवा सरड्याचा आहार समजून घेणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट होते. क्षमता गायकवाड आणि वरद गिरी हे या स्पर्धेचे आयोजक असून ‘नायडस’ संस्थेने मिडडे, महाएमटिव्ही, नेचर वॉक, शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई यांच्या सहकार्याने ही निसर्गाचे मूल्ये जपण्यासाठी स्पर्धा भरवली आहे.
गोवर्धन अशोक पाटील याला शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, वर्गशिक्षिका स्नेहल पोटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Belgaum Varta Belgaum Varta