बेळगाव : गणेशपूर, सांभाजी नगर फर्स्ट क्रॉसजवळ, अरविंद शिरोले मागील चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला झोपले होते. स्थानिक व्यावसायिक महिला सरोजा अमित शिरोलकर गेल्या तीन दिवसांपासून त्याना भोजन आणि त्याची काळजी घेत होते. तथापि, आज सकाळपासून त्याचे आरोग्य अचानक ढासळले आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली.
त्यावेळी सरोजा शिरोलकर यांनी मदतीसाठी तातडीने सुरेंद्र अनागोळकर फाउंडेशनशी संपर्क साधला. फाउंडेशनच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अरविंदला नागरी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर, त्याला निराधार काळजी केंद्रात सुरक्षितपणे नेऊन ठेवण्यात येणार आहे. हा उपक्रम स्थानिक पातळीवर एक उत्तम उदाहरण आहे.

Belgaum Varta Belgaum Varta