बेळगाव : ः दमशिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदीगणूर येथे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा नुकताच संपन्न झाला.
शाळा व पदवीपूर्व कॉलेज सुधारणा कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत संतराम कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष नारायण पाटील व सदस्य कल्लाप्पा कडोलकर, भैरू पाटील, कल्लप्पा पाटील, अनिता चौगुले, मल्लाप्पा पाटील, शिवराज हुद्दार, पुंडलिक बेळगावकर, ज्योतिबा कोतेकर व प्राचार्य एस. एस. मोहिते हे व्यासपीठावर उपस्थित होते. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
पुंडलिक बेळगावकर यांनी महाविद्यालयाला देणगी स्वरूपात संगणक दिल्याबद्दल त्यांचा कार्यक्रमाप्रसंगी सत्कार करण्यात आला. अध्यक्ष कुऱ्हाडे बोलताना, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. यामुळे बहुजन समाजाच्या मुलामुलींनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आजचे युग हे स्पर्धात्मक असून मुला मुलींनी ध्येय ठेवून ज्ञान मिळविल्यास यश संपादन करता येते. कला व वाणिज्य क्षेत्रामध्ये सुद्धा भविष्याच्या अनेक शैक्षणिक व रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे असे विचार व्यक्त केले.
विद्यार्थी घडविण्यामध्ये विद्यार्थी- पालक व शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. असे विचार प्राध्यापिका डॉ. विनया कांबळे यांनी व्यक्त केले. शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य कलाप्पा पाटील व पुंडलिक बेळगावकर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल कांबळे यांनी केले. आभार प्रा. आर एस पाटील यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta