
बेळगाव : बिम्स रुग्णालयाने आणखी एक मोठी चूक समोर आली आहे. ऑपरेशन दरम्यान पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाचे आतडे कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रातील एक गंभीर चूक समोर आली आहे. पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या एका तरुणाचे आतडे शस्त्रक्रिये दरम्यान कापल्याची घटना घडली आहे.
महेश मादार नावाच्या एका तरुणाला २० जून रोजी पोटदुखीमुळे बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हाच डॉक्टरांनी त्या तरुणावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिये दरम्यान त्याच्या पोटातील गाठ काढण्याऐवजी त्यांनी त्याचे आतडे कापले, बाहेर काढले आणि टाके घातले. शस्त्रक्रियेनंतर त्या तरुणाला घरी पाठवण्यात आले. घरी गेलेल्या तरुणाला अधिक तीव्र पोटदुखी होऊ लागली. त्या तरुणाला केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्कॅन दरम्यान असे आढळून आले की त्याचे आतडे कापले गेले आहेत. सध्या त्या तरुणावर केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे रुग्णाला तसेच त्याच्या कुटुंबीयांना तीव्र मनस्ताप सोसावा लागला आहे. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत
Belgaum Varta Belgaum Varta