Thursday , December 11 2025
Breaking News

रॅपिड ॲक्शन फोर्सचे बेळगावात पथसंचलन

Spread the love

 

बेळगाव : श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे शहरातील विविध मार्गांवर लक्षवेधी पथसंचलन झाले.

या पथसंचलनाला शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून प्रारंभ झाला . तेथून चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, शास्त्री चौक, दरबार गल्ली, खडेबाजार, जालगार गल्ली, खडक गल्ली मार्गे मार्केट पोलीस ठाण्याच्या ठिकाणी सांगता झाली. श्री गणेशोत्सव काळात बेळगाव मधील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने गर्दी करत असतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासना कडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहराच्या संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. त्याची झलक दर्शविण्यासाठी विविध भागांमध्ये हे पथसंचलन झाले.

About Belgaum Varta

Check Also

मच्छे शाळा सुधारणा कमिटी अध्यक्षपदी गजानन छप्रे

Spread the love  मच्छे : गावातील सरकारी मॉडेल प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे शाळा सुधारणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *