बेळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी वंटमुरी, बेळगाव येथील सरकारी रुग्णालयामधील घडली असून निखिता मादर असे मृत्युमुखी पडलेल्या बाळंतिणीचे नांव आहे. मुलीच्या जन्मानंतर लगेच तिचे निधन झाले. प्रसूती जवळ आल्यामुळे निखिता हिला गेल्या शुक्रवारी प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नैसर्गिक प्रसुती शक्य नसल्यामुळे तिला सिझरीन शस्त्रक्रियेसाठी वंटमुरी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. त्या ठिकाणी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून निकिता हिने मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर अल्पावधीत प्रकृती बिघडून तिचे निधन झाले. निखिताचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. सदर घटनेची माळमारुती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta