येळ्ळूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज-जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला आणि रविवारी ‘छ. शिवाजी उद्याना’पासून सुरू होणार्या सकल मराठा समाजाच्या मोर्चात बहुसंख्येने हजर राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी ए.पी.एम.सी. सदस्य श्री. वामनराव पाटील हे होते.
प्रारंभी श्री. प्रकाश अष्टेकर यांनी मराठा समाजाचे आंदोलनाचा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार असून या मोर्चात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी, युवा नेते श्री. दत्ता उघाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. राजू पावले यांनी विचार व्यक्त केले.
या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य श्री. दयानंद उघाडे, राकेश परीट, माजी ता. पंचायत सदस्य श्री. चांगदेव परीट, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, सुरज गोरल, शिवाजी सायनेकर, नागेश बोबाटे, कृष्णा शहापूरकर, प्रकाश मालुचे, सतीश देसुरकर, बाळु पाटील, भिमराव पुण्यानावर कृष्णा बिजगरकर परशराम कणबरकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार श्री. शिवाजी कदम यांनी मांडले.

Belgaum Varta Belgaum Varta