Saturday , December 13 2025
Breaking News

लक्ष्मीनगर हिंडलगा येथील चोरी प्रकरणाचा छडा : दोघांना अटक; ८५ लाखांचे दागिने जप्त

Spread the love

 

कॅम्प पोलिसांची कारवाई
बेळगाव : लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे २ ऑगस्ट रोजी घडलेल्या मोठ्या चोरीचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल ८५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्नपूर्णा जोतिबा बेळगुंदकर (रा. गणेशपुर) आणि जोतिबा गुंडू बेळगुंदकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत

चोरीतून एकूण ९८१.१ ग्रॅम सोने चोरीस गेले होते, त्यापैकी तब्बल ८७७.४ ग्रॅम सोने पोलिसांनी परत मिळविण्यात यश मिळवले आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, उपायुक्त एन. निरंजन राजेआरस व खडेबाजार एसीपी शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कॅम्प पोलीस स्थानकाचे आनंद वनकुंद्री, डी. पी. निंबाळकर आणि त्यांच्या पथकाने तपास करून ही मोठी कामगिरी पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक १३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *