येळ्ळूर : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये वित्तीय समावेशन विभागातर्फे शासकीय योजनांविषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे युनियन बँक ऑफ इंडिया बेळगावचे क्षेत्र प्रमुख श्री. राघवेंद्र बी एस, उप क्षेत्रप्रमुख श्री. मनीष मेघन्नावर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी मासेकर, माजी अध्यक्ष श्री. सतीश पाटील, सदस्य श्री. शिवाजीराव नांदूरकर, वित्तीय समावेशन विभागाचे तानाजी गावडे यांची उपस्थिती होती.
प्रधान मंत्री जीवन ज्योती योजना, प्रधान मंत्री जीवन सुरक्षा योजना व अटल पेन्शन योजना या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन क्षेत्र प्रमुख मा. श्री. राघवेंद्र बी एस सरानी केले. तसेच डिजिटल बँकिंगचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयीही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्वांनी या शासकीय योजनांचा लाभ घेऊन इतरांनाही या योजनाबद्दल मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन मा. मनीष मेघन्नावर यांनी केले. ग्रामपंचायत व बँक यांच्या सहयोगाने येळ्ळूर गावामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारी योजना पोहचवण्याचे काम केले जाईल असे प्रतिपादन अध्यक्षा मा. लक्ष्मी मासेकर यांनी केले. तसेच मा. श्री सतीश पाटील यांनी युनियन बँक ऑफ इंडियातर्फे लोकापर्यंत सरकारी योजना पोहचवण्याच्या उपक्रमाचे कौतुक ही केले.
बँकेच्या येळ्ळूर शाखेतर्फे लाभार्थ्यांना प्रधान मंत्री जीवन ज्योती योजनेमधून प्रत्येकी 2 लाख रु. ची विमा रक्कम मिळवून देण्यात आली आहे, अशी माहिती शाखा प्रमुख अभिजित सायमोते यांनी दिली.
तसेच बचत गटांना विविध शासकीय योजनांबद्दल बँकेच्या कृषी अधिकारी माया रेमाणी यांनी सविस्तर माहिती दिली व 2 बचत गटांना कर्जाचे वितरण ही करण्यात आले.
शाखा प्रमुख अभिजीत सायमोते यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे संयोजन उप शाखा प्रमुख दिलीप कुमार, प्रदीप पोतदार, चंद्रकांत हम्पन्नावर, गुरुनाथ पाटील, सिद्धार्थ पाटील, शाम कुंभार यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta