Thursday , March 5 2026
Breaking News

कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून टिळकवाडीत महिलेचा खून

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एका महिलेचा खून करण्यात आला आहे.गीता रणजीत दावले गवळी (वय 55) असे मयत महिलेचे नाव आहे.

मयत गीता हीचा दीर गणेश गवळी याने आज सकाळी आठच्या दरम्यान गीता यांच्यावर चाकूचे सपासप वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणामुळे टिळकवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश गवळी याला टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पुढील अधिक तपास सुरू आहे. मयत गीता यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *