रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली रामेश्वर नाईक यांची भेट
बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सीमाभागात अधिक सोपी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्याकडे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सीमाभागातील रुग्णांना तातडीने आणि सुलभतेने मदत मिळावी यासाठी प्रणाली सुधारण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, “येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यापासून मुख्यमंत्री सहायता निधीची प्रणाली आणखी सोपी करण्यात येईल, जेणेकरून सीमाभागातील नागरिकांना वेळीच मदत पोहोचेल.”
दरम्यान, रमाकांत कोंडुसकर यांनी विविध हॉस्पिटल्सचा मुख्यमंत्री सहायता निधीच्या यादीत समावेश करण्याची विनंती केली. यावर प्रतिसाद देताना श्री. नाईक यांनी “येणाऱ्या आठवड्यात काही हॉस्पिटल्सना पॅनलवर घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल,” असे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta