Wednesday , March 4 2026
Breaking News

ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी तर चिटणीसपदी सुरेन्द्र देसाई यांची फेरनिवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी सदस्यांची बैठक विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात 2025 ते 2028 या तीन वर्षासाठी पुढील पदाधिकारी व कार्यकारी सदस्य निवडण्यात आले.
उपाध्यक्ष के.एल. मजूकर, सहचिटणीस शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी, कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ शिंदे, विजय वाईगडे, वनिता जोशी, सदाशिव कुलकर्णी, स्नेहलता जुवळी व विठ्ठल पोळ
सल्लागार म्हणून डी.पी. शिंदे सुरेन्द्र नायक, जवाहर देसाई, लक्ष्मण सलगार व प्रकाश कुडतरकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी सदाशिव कुलकर्णी यांनी पाच हजार रूपयांची देणगी जाहीर केली. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून आर.पी. पाटील यांनी काम पाहिले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *