बेळगाव : बेळवट्टी – बकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचा १९ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन बी. बी. देसाई होते.
संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मनोहर सांबरेकर, मारुती कांबळे, अर्जुन पाटील, सातेरी चांदीलकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. शंकर गोडसे यांनी गणेश पूजन केल्यानंतर गणपत पाटील यांनी सरस्वती पूजन केले. गोविंद चौगुले यांनी लक्ष्मीपूजन, नामदेव पाटील यांनी शिव प्रतिमेचे पूजन व विठ्ठल चौगुले यांनी विठ्ठल- रुक्माई देवीचे पूजन केले.
याच कार्यक्रमाच्या औचित्य साधून सातेरी चांदीलकर व व पुंडलिक चांदीलकर या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचाही विशेष पारितोषक देऊन गौरव करण्यात आला.
सोसायटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर नलावडे यांनी अहवाल सादर केला, त्यावर चर्चा करून अहवालाला व अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.
अध्यक्ष बी. बी. देसाई यांनी सोसायटीने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देऊन सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले. यावेळी उपाध्यक्ष नारायण नलावडे, तुकाराम कांबळे, पांडुरंग नाईक यांचीही भाषणे झाली.
सोसायटीचे संचालक अशोक मजुकर यांनी आभार मानले. बैठकीला संचालक आप्पू नाकाडी, अर्जुन पाटील, मधु नलावडे, सावित्री चौगुले, वैष्णवी सुतार निर्मला गायकवाड लुमाणा लावडे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta