Wednesday , March 4 2026
Breaking News

वायूसेना अधिकाऱ्यांची शहापूर येथील रवींद्र कौशिक ई- वाचनालयाला भेट

Spread the love

 

बेळगाव : भारतीय वायूसेनेच्या सांबरा येथील एअरमेन ट्रेनिंग स्कूलचे अधिकारी जेडब्ल्यूओएस अभिषेक बच्चन, टी. एन. साधू आणि सार्जंट अमित कुमार यांच्यासह ४० प्रशिक्षणार्थीच्या पथकाने शहापूर येथील रवींद्र कौशिक ई- सेंट्रल वाचनालयाला भेट देऊन माहिती घेतली. वायूदल प्रशिक्षणातंर्गत वाचननालय व्यवस्थापन आणि कामकाजाबाबत माहिती घेतली. वाचनालय विभागाचे उपसंचालक रामय्या यांनी त्यांना वाचनालय कायदा, आर्थिक तरतूद, प्रशासकीय बाबी, पुस्तक खरेदी इत्यादींबाबत माहिती दिली. तांत्रिक विभागाचे ग्रंथपाल एस. एस. सीमीमठ आणि प्रकाश इचलकरंजी यांनी ग्रंथालयाच्या विभागांचे काम, पुस्तक संग्रह, नोंदणी प्रक्रिया याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा विभाग, इंटरनेट विभाग, मासिके, वृत्तपत्रे, बालविभाग, याबाबत वाचनालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. प्रशिक्षणार्थीनी ग्रंथालय व्यवस्थापन आणि सेवेबद्दल समाधान व्यक्त करुन आवश्यक माहिती जाणून घेतली. दरवर्षी प्रशिक्षणार्थी ग्रंथालयाला शैक्षणिक भेटी देऊन माहिती घेतात. यावेळी सुमित कावळे, आनंद मुतगी, संगीता, द्राक्षायिनी, लता एम., आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *