बेळगाव : शहरात ईद – ए – मिलाद सणानिमित्त रविवारी मुस्लीम बांधवांच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन केले आहे. मिरवणूक पिंपळकट्टा येथून सुरू होऊन फोर्ट रोड, मुजावर खूट, मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट पोलीस स्टेशन क्रॉस, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, फिश मार्केट, ग्लोब सर्कल येथून आसदखान दर्गा येथे सांगता होते. मिरवणूक काळात वाहतूक समस्या निर्माण होऊ नये, यासाठी रविवार दि १४ रोजी सकाळी ८ ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्गात बदल करण्यात आला आहे. किल्ला तलाव, अशोक सर्कल, आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कलकडून कॉलेज रोड मार्गे खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी अशोक सर्कल, लेकव्हयू हॉस्पिटल, कनकदास सर्कल, कॅन्सर हॉस्पिटल, के.एल.ई., हिंडाल्को ब्रीज, बॉक्साईड रोड, हनुमाननगर डबल रोड, हिंडलगा गणपती मंदिर, गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय नं. २, शर्कत पार्क, एमएलआयआरसी कैंटीन क्रॉस, मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस मार्गे खानापूर रस्त्याकडे जावे, गोगटे सर्कल रेल्वे उड्डाण पूल रस्त्याच्या मार्ग शहराकडे येणाऱ्या वाहनांनी गोगटे सर्कल, डावीकडून वळण घेऊन काँग्रेस रोड, मिलिटरी महादेव मंदिर येथून उजवीकडे वळण घेऊन एमएलआयआरसी कैंटीन क्रॉस मार्गे पुढे जावे. खानापूरकडून काँग्रेस रोड मार्गावरून शहराकडे येणाऱ्या वाहनांनी मिलिटरी महादेव मंदिरकडून डावीकडे वळण घेऊन एमएलआयआरसी कैंटीन क्रॉस, शर्कत पार्क मार्गे पुढे जाऊन बॉक्साईड रोड येथून राष्ट्रीय महामार्गाकडे जावे. गोगटे सर्कलकडून येणाऱ्या वाहनांनी स्टेशन रोड मार्गे पुढे जाऊन भातकांडे स्कूल क्रॉस ओल्ड पी. बी. रोड मार्गे पुढे जावे. नाथ पै सर्कलकडून बँक ऑफ इंडियाकडे येणाऱ्या वाहनांनी बसवेश्वर सर्कल संभाजी गल्ली मार्गे पुढे जावे.
Belgaum Varta Belgaum Varta