बेळगाव : विश्व भारत सेवा समितीच्या बेळगुंदी हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील क्रीडास्पर्धांसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थी कुमार ओमकार विठ्ठल सुतार याने १४ वर्षाखालील गटात कुस्तीमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वप्निल महादेव बोकमुरकर याने उंच उडीत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, तर राहुल रावसाहेब देसाई याने पोलार्ड मध्ये तालुका पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्याना संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी, शाळेचे मुख्याध्यापक एम. वाय. पाटील, क्रिडा शिक्षक पी. बी. भास्कर आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta