

बेळगाव : मिशन ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या कर्नाटक राज्याध्यक्ष पदी बेळगावचे सुपुत्र पैलवान अतुल शिरोळे यांची निवड करण्यात आली आहे.
मिशन ऑलिम्पिक असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून बेळगाव सहा कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी कुस्ती व अनेक क्रीडा प्रकारच्या विषयी काम केले जाणार आहे. बेळगाव मधील भावी खेळाडूंना या संघटनेच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.
या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे: पै.अतुल शिरोले – अध्यक्ष, महेश गुंजीकर – उपाध्यक्ष, मनोज बिर्जे – सेक्रेटरी, अमर निलजकर – उप-सेक्रेटरी, दुरदुंडेश्वर मिडकनटी- तांत्रिक कमिटी अध्यक्ष, भावेश बिर्जे – खजिनदार, चेतन देसाई – उप-खजिनदार गंगाधर एम – सदस्य, विद्या पाटील – सदस्य
Belgaum Varta Belgaum Varta