Wednesday , March 4 2026
Breaking News

वेदांत सोसायटीला १४ लाखांचा निव्वळ नफा; १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

Spread the love

 

बेळगाव : वडगाव- शहापूर रोड येथील वेदांत मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांच्या विश्वासार्हतेच्या बळावर सोसायटीला यावर्षी १४ लाख ९५१ रुपयांचा निव्वळ नफा झाला, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन संदीप खन्नुकर यांनी यावेळी दिली.
संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेच्या प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध बिल्डर आणि क्रेडाई संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत वांडकर तसेच संस्कृती एज्युकेशन केअर चे संचालक तेजस कोळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या बैठकीत संस्थेच्या व्यवस्थापिका विद्या उच्चुकर यांनी नफा तोटा तर नम्रता कलघटकर आणि धनश्री हलगेकर यांनी ताळेबंद सादर केला. संचालक राहुल अडके यांनी निधी वर्गीकरण सादर केले. ऋतुराज सुतार यांनी संस्थेच्या मागील वार्षिक उलाढालीची माहिती दिली.
या बैठकीत विविध परीक्षांमध्ये विशेष गुण प्राप्त केलेल्या सभासदांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन संदीप खन्नुकर व अन्य संचालकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल स्मृतीचिन्ह आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सोसायटीने आर्थिक व्यवहाराबरोबरच,सामाजिक हिताचे ध्येय बाळगून चालविलेल्या कार्याचे, प्रशांत वांडकर आणि तेजस कोळेकर यांनी कौतुक व्यक्त केले. त्याचबरोबर सोसायटीच्या भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते गणेश पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक सल्लागार जयवंत खन्नुकर यांनी केले. प्रकाश सुळेभावी यांनी सर्वांचे आभार मानले. कल्याणी सपकाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेला, सोसायटीचे व्हाईस चेअरमन अमर चिल्लाळ यांच्यासह संचालक कृष्णा सायनेकर, ज्ञानेश्वर सायनेकर, राहुल अडके, जयकुमार पाटील, डॉक्टर संपतराव पाटील, ऍड. सोमनाथ धामण्णावर, रमाकांत कारेकर, संचालिका सौ. सरस्वती होसुरकर, सल्लागार ऍड. सागर खन्नुकर, श्रीधर खन्नुकर, रामकृष्ण बाळकर यांच्यासह सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *