
बेळगाव : कुडची येथून हैद्राबादकडे गोमांसाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी लॉरीला अडवून चक्क लॉरीलाच आग लावून आपला संताप व्यक्त केल्याची घटना कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील उगार रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ सोमवारी रात्री 10 च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडची शहरातून हैदराबादला ५ टन गोमांसाची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती हिंदू कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी चार लॉरींपैकी एका लॉरीला थांबवून चौकशी केली असता, ती लॉरी गोमांस निर्यात करत असल्याचे आढळून आले. संतप्त तरुणांनी लॉरीला आग लावली आणि आपला संताप व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच अथणी झोन डीवायएसपी आणि कागवाड पोलिस ठाण्याने घटनास्थळी भेट दिली आणि लॉरीमधील दोघांना ताब्यात घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लॉरीला लागलेली आग विझवली आणि कागवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta