Saturday , November 7 2026
Breaking News

गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या लॉरीला संतप्त हिंदू कार्यकर्त्यांनी लावली आग

Spread the love

 

बेळगाव : कुडची येथून हैद्राबादकडे गोमांसाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी लॉरीला अडवून चक्क लॉरीलाच आग लावून आपला संताप व्यक्त केल्याची घटना कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथील उगार रस्त्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ सोमवारी रात्री 10 च्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडची शहरातून हैदराबादला ५ टन गोमांसाची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती हिंदू कार्यकर्त्यांना समजल्यावर त्यांनी चार लॉरींपैकी एका लॉरीला थांबवून चौकशी केली असता, ती लॉरी गोमांस निर्यात करत असल्याचे आढळून आले. संतप्त तरुणांनी लॉरीला आग लावली आणि आपला संताप व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच अथणी झोन ​​डीवायएसपी आणि कागवाड पोलिस ठाण्याने घटनास्थळी भेट दिली आणि लॉरीमधील दोघांना ताब्यात घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लॉरीला लागलेली आग विझवली आणि कागवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *