Thursday , March 5 2026
Breaking News

अपघातातील जखमीला सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवर झालेल्या रस्त्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस वेळेत सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केल्याने त्याचा जीव वाचण्यास मदत झाली आहे. मंगळवारी 23 रोजी रात्री 10 वाजता बेळगाव शहरातल्या
काँग्रेस रोड, टिळकवाडी येथील अरुण थिएटरसमोर मोठा अपघात झाला चारचाकी वाहनाची दुचाकीशी धडक होऊन दुचाकीवरील मागील प्रवासी गंभीर जखमी झाला होता.

जखमी व्यक्तीची ओळख दादासाहेब पाटील अशी झाली असून ते गणेशपूर येथील सिंडिकेट बँक कॉलनीत राहतात. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत तसेच फ्रॅक्चर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर भारतीय सैन्याचे निवृत्त सुभेदार सुधाकर चाळके यांनी अपघातग्रस्ताला पाहून त्वरित मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तत्काळ 108 व 112 आपत्कालीन सेवांना संपर्क साधून मदत मागवली.

काही वेळातच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमीला प्राथमिक उपचार देऊन विजय ऑर्थो हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. या दरम्यान चाळके आणि दरेकर यांनी रुग्णासोबत राहून सातत्याने मदत केली.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *