Thursday , March 5 2026
Breaking News

विविध कार्यक्रमांनी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याच्या 7 व्या आणि मराठा सेवा संघ भारतच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त गडहिंग्लजचे प्रा. पी. डी. पाटील यांचे व्याख्यान, भव्य वक्तृत्व स्पर्धा आणि मराठा समाज स्नेहमिलन मेळावा असा संयुक्त कार्यक्रम येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे उत्साहात पार पडला.

शिवाजी विद्यालय येळ्ळूर बेळगांव येथे गेल्या रविवारी 21 सप्टेंबर रोजी विजय नंदिहळ्ळी (अध्यक्ष विश्व भारत सेवा समिती बेळगांव) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पुजन व शिव पुजनाने झाली. त्यानंतर प्रमुख वक्ते शिवश्री प्रा. पी. डी. पाटील (गडहिंग्लज), प्रमुख पाहुणे शुभम शेळके (युवा समिती सिमाभाग अध्यक्ष बेळगांव), धनंजय पाटील (अध्यक्ष खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती), राजेंद्र मुतगेकर (संचालक बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स), वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक शिक्षिका शिवमती ऐश्वर्या मेणसे, प्राध्यापक मायाप्पा पाटील आणि प्रकाश पाटील (मुतगा) यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत, तर मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी प्रास्ताविक केले.

आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे शुभम शेळके यांनी सण, मराठी भाषेला नाकारणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना नाकारल्यासारखे आहे. उत्सव हे मोठ्या प्रमाणात करण्यासह समाज कार्यामध्येही भाग घ्यावा, असे मत व्यक्त केले. मराठा समाजाचा प्रश्न सुटण्यासाठी प्रत्येकाने झोकून देऊन काम केले पाहिजे असे राजेंद्र मुतगेकर म्हणाले. यानंतर प्रमुख वक्ते प्रा. पी. डी. पाटील (गडहिंग्लज) यांनी “मराठा समाजाच्या सामाजिक, शौक्षणिक आणि आर्थिक उन्नतीचा राजमार्ग” या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी भाषण कसे करावे याबद्दल सांगितले. प्रत्येकाने वास्तवाला भिडायला शिकले पाहिजे. यात्रा-जत्रा या कमी खर्चात केल्या पाहिजेत. प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषा, मराठी शाळा, आणि मराठीवरच प्रेम टिकवून ठेवल पाहिजे असे ते म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान लहान गट, माध्यमिक गट, खुला गट वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे घोषित करण्यात आला. लहान गट : प्रथम पारितोषिक 1501 रु. -पूर्वी घाडी, व्दितीय पारितोषिक 1001 रु. -भूमी भातकांडे, तृतीय पारितोषिक 501 रु. -ऋणाली पाटील. माध्यमिक गट : प्रथम पारितोषिक 3111 रु. -समृध्दी सांबरेकर, व्दितीय पारितोषिक 2111 रु. -वैष्णवी कुंडेकर, तृतीय पारितोषिक 1111 रु. -दूर्वा घाडी. खुला गट : प्रथम पारितोषिक 4111 रु. -समृद्धी पाटील, व्दितीय पारितोषिक 3111 रु. -डॉ. किर्ती बिर्जे, तृतीय पारितोषिक 2111 रु. -आरती गोरल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठा सेवा संघाचे सचिव मनोहर घाडी यांनी केले. शेवटी संघाचे उपाध्यक्ष नारायण सांगावकर यांनी आभार व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *