Thursday , March 5 2026
Breaking News

विजयोत्सवादरम्यान कत्ती समर्थकांकडून मंत्री सतीश जारकीहोळींच्या सहकाऱ्यांवर दगडफेक!

Spread the love

 

बेळगाव : हुक्केरी विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि माजी खासदार रमेश कत्ती यांच्या समर्थक उमेदवारांनी मोठा विजय मिळवला आहे. दरम्यान, विजयोत्सव साजरा करताना रमेश कत्ती समर्थकांनी अपमानास्पद वर्तन केले आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या गाडीवर हाताने मारबडव केली आणि दगडफेकही केली.

विजयोत्सवादरम्यान केलेल्या या प्रकारामुळे काहीवेळ परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. पोलिसांनी दोन्ही गटाच्या समर्थकांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

निवडणुकीपूर्वी माजी खासदार रमेश कट्टी यांनी जारकीहोळी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी एका शब्दात त्यांच्या विरोधकांवर टीका केली होती. त्याचेच पडसाद विजयोत्सवावेळी दिसले.

 

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *