Thursday , March 5 2026
Breaking News

कंग्राळी के.एच. ग्रामपंचायत कार्यालयासह नवीन ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यात येणाऱ्या कंग्राळी के.एच. ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालय आणि ग्रंथालयाच्या इमारतींचे लोकार्पण अतिशय उत्साहात पार पडले. या इमारतींच्या उद्घाटनामुळे ग्रामस्थांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या असून, प्रशासकीय कामांना गती मिळणार आहे.

बेळगाव जिल्ह्याचे प्रशासन, जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन योजनेअंतर्गत कंग्राळी के.एच. येथील ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालय आणि ग्रंथालयाच्या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. आज महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तर विभागाचे आमदार आसिफ सैठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, काडा अध्यक्ष युवराज कदम यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या इमारतींचे लोकार्पण झाले.

यावेळी बोलताना सदस्य रमेश कांबळे यांनी नूतन इमारत मंजूर करून ती पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे अभिनंदन केले. “नूतन इमारत मंजूर करून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.” असे त्यांनी म्हटले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष कल्लप्पा पाटील, यल्लप्पा पाटील, ज्योती पाटील, प्रशांत पाटील, रेणुका पावशे, वीणा पुजारी, राधा कांबळे यांच्यासह अन्य सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *