

बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी जेष्ठ नागरिक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक आणि समाजाला आदर्श असणाऱ्या क्रियाशील व्यक्तीमत्वांना संजीवीनी ज्येष्ठ नागरिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
यावर्षी संगीत गुरू शंकर पाटील, नाट्य दिग्दर्शिका सुनिता पाटणकर आणि समाजसेविका कवियत्री स्मिता पाटील यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सात ऑक्टोबर रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि चेअरमन मदन बामणे यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta