Friday , March 6 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन उद्या

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून “वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन उद्या शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली बेळगाव येथे करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ धैर्य वाढावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्व कला जोपासावी आणि आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावेत यासाठी प्राथमिक (४थी ते ७वी), माध्यमिक (८ वी ते १० वी) आणि महाविद्यालयीन (११ वी ते पदव्युत्तर) अशा तीन गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. खालील गटांमधील ४ पैकी एका विषयात विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

प्राथमिक गट
१) मोबाईल बालपणाचा शत्रू की मित्र
२) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम – व्यक्तिमत्व व विचार
३) मराठी भाषेचे संवर्धन माझी जबाबदारी
४) शालेय जीवनात खेळाचे महत्त्व

माध्यमिक गट
१) युवकांमध्ये वाढती व्यसनाधिनता
२) सोशल मिडिया (समाज माध्यम) चिंता आणि चिंतन
३) अभिजात मराठी भाषा – भविष्यातील आव्हाने
४) स्वतंत्र भारताच्या बांधणीत सरदार वल्लभभाई पटेलांचे योगदान

महाविद्यालयीन गट
१) लोकशाही की एकाधिकारशाही?
२) व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी – इतिहासाचे विद्रुपीकरण
३) युवा पिढीचा वैज्ञानिक दृष्टिकोन
४) अभिजात मराठी भाषा – भविष्यातील आव्हाने.

बक्षिसाचे स्वरूप : प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोखरक्कम असे असेल.
अजूनही स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांसाठी स्पर्धास्थळी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी काही मर्यादित प्रवेश दिले जातील याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *