

बेळगाव : डॉ. रामचंद्र भागवत, लखनौ, यांचा कीर्तन व शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम शहापूर विठ्ठलदेव गल्लीतील श्री विठ्ठल मंदीर (जुने) येथे आयोजित करण्यात आला आहे.
कीर्तन शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता कीर्तन आणि रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सारंग कुलकर्णी व हृषिकेश हेर्लेकर संवादिनी साथ करणार आहेत. तबला साथ अंगद देसाई करणार आहेत. कीर्तन आणि गायनाच्या कार्यक्रमाचा भक्त आणि संगीत प्रेमिनी लाभ घ्यावा असे विठ्ठल मंदिरातर्फे कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta