Monday , December 8 2025
Breaking News

रयत गल्लीत साकारला दुर्ग भरतगड

Spread the love

 

बेळगाव : पिढ्यानपिढ्या मातीशी घट्ट नात असलेल्या शेतकऱ्यांच्या रयत गल्लीतील विद्यार्थ्यांनी कल्पकतेने, सुंदर, लक्ष वेधून घेणारा साकारला दुर्ग भरत गड. दसरा संपला की बेळगाव परिसरातील विद्यार्थी तसेच युवकांना छत्रपती शिवरायांच्या काळातील दुर्ग तसेच किल्ले बनवण्यासाठी लगभग लागते. त्यामागे एक शास्रीय कारणही आहे. कारण उन्हात तापलेल्या मातीत जर पाणी पडले की त्यातून जो मनमोहक सुगंधीत वास येतो तो आरोग्यासाठी हितकारक आणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा असतो. कारण या काळात अनेक रोगांचा फैलाव होत असतो तो या मातीच्या वासाने कमी व्हावा तसेच लहानपनापासूनच मुलांना छत्रपती शिवराय, शंभुराजांचा ईतिहास समजावा याच औचित्य साधूनच हि कल्पना मागिल अनेक पिढ्यानीं सुचवल्याचे प्रकर्षाने जाणवते.
आता कर्नाटकातील मराठा समाज जो कानडी भाषा बोलणारेही जाग्रूत झाल्याने बेळगावमधील मुर्तिकारांकडून छत्रपती शिवरायांच्या अनेक मुर्ती घेऊन जात आहेत. परत आपल्या लहान मुलांना किल्ले, दुर्गही बनवायला लावताहेत. त्याचबरोबर इतर जातिची लहान मुलंही एकत्र येऊन आपल्या कल्पनेप्रमाणे छोटे छोटे किल्ले बनवातात, कांहीजन बाजारात विक्रीसाठी ठेवलेले तसेच सैनिकही घेऊन येतात आणी आपल्या मुलांना छत्रपती शिवराय, शंभूराजाविषयी आदर, आत्मियता, ईतिहास जोपासण्याची संधी करुन देतात. यावरुनच कळून येत कि छत्रपती शिवराय, शंभूराजे पिढ्यादरपिढ्यांच्या स्मरणात सतत तेवत रहाणार.
त्याच अनुशंगाने रयत गल्लीत दरवर्षी वेगवेगळ्या दुर्ग, किल्ल्यांची प्रतिक्रूती साकारली जाते त्यातील यावर्षी दुर्ग भरतगडचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. 7/10/2025 रोजी रात्री गल्लीतील तसेच इतर प्रतिष्ठितांच्या हस्ते झाला.
सदर दुर्ग बनवण्यासाठी बलराम बिर्जे, मयुरेश तारिहाळकर, कृष्णा बिर्जे, स्वप्निल तारिहाळकर, यश पवार, कार्तिक मठकर, विघ्नेश तारिहाळकर, सर्वेश बिर्जे सह इतर विद्यार्थ्यांनी अगदी सुंदर असा बनवला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *