

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने भारतीय वीर आणि शहिदांना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला असून कॅन्टोन्मेंट बोर्डातील 34 ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅम्प परिसरात असलेल्या “हाय स्ट्रीट” या रस्त्याचे नाव बदलून थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या रस्त्याचे नामकरण करण्यात आले असून तसा फलक देखील आज बसविण्यात आला आहे. या संदर्भात आठ महिन्यापूर्वीच कॅन्टोन्मेंट मध्ये ठराव करण्यात आला होता. या ठरावाची अंमलबजावणी आज गुरुवारी करण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डाने केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच नाही तर इतर राष्ट्रीय वीरांना देखील सन्मानित केले आहे. कॅम्प परिसरातील “नॉर्थ टेलिग्राफ रोड”चे नामांतर करत आता बेळवडी मल्लम्मा असे नामकरण केले आहे तर “स्मार्ट रोड” परिसराला शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी “पिकेट रोड” परिसराला लान्स नायक हनुमंतप्पा रोड, “पोस्ट गार्डन रोड” ला गंगुबाई हनगल तर “एक्साईज गार्डन” रोडला पंडित भीमसेन जोशी यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने केलेल्या नामकरणावर समाज माध्यमात विविध प्रतिक्रिया उमटल्या असून काहींनी या निर्णयावर टीका केल्या आहेत तर काहींनी या निर्णयाचे समर्थन केल्याचे पहावयास मिळत आहे तर एका नागरिकांनी याबाबत प्रतिक्रिया देत असताना सांगितले की, नामकरण करून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याऐवजी या भागात खड्डे विरहित रस्ते बांधण्यावर कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले तर बरे होईल अशा शब्दात प्रशासनाला सुनावले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डने ब्रिटिश कॅलरी रस्त्यांची नावे बदलून राष्ट्रवीरांचा सन्मान करण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असला तरी नामांतराच्या या नवीन संस्कृतीने मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा देखील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta