

बेळगाव : करवेचे नारायण गौडा यांच्या प्रक्षोभक वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेले समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर माळ मारुती पोलिसांनी त्यांचा मोबाईल आणि काही जप्त करत त्यांची रात्री उशिरा जामीनावर मुक्तता केली.
युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवसभर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते रात्री त्यांची पोलिस स्थानकातून जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्यादरम्यान पोलिसांनी शेळके यांचा मोबाईल आणि कार ही जप्त केली आहे.
मंगळवारी सकाळी 9:30 शेळके यांना माळ मारुती पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशी सुरू केली आणि दिवसभर स्थानबद्ध केले. दुपारच्या सत्रात पोलिसांनी चौकशीकरिता शेळके यांचा मोबाईल आणि कार गाडी जप्त केली. ज्या ठिकाणी गाडीच्या बाजूला थांबून व्हिडिओ करण्यात आलेली गाडी आणि चित्रीकरणासाठी वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला त्यानंतर रात्री उशिरा पोलीस स्थानकात जामीन मिळाला त्यानंतर मुक्तता करण्यात आली वकील महेश बिर्जे यांनी वकील म्हणून काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta