

बेळगाव : मंगळवारी रात्री शेतात सर्प दंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली असून करण पाटील (वय 34) कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, करण हा पुणे येथील एका नामांकित कंपनीत कामाला होता. सध्या तो वर्कफ्रॉम होम काम करत होता. त्यामुळे तो आपल्या गावी आला होता. मंगळवारी रात्री घरा समोरील शेतात त्याला साप चावला होता. लागलीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काही उपयोग झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
Belgaum Varta Belgaum Varta