Thursday , March 5 2026
Breaking News

मिरजमध्ये तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी छापा टाकून एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातील मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली असून छाप्यादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पैकी एक जण पोलीस ठाण्याचा ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळतात मिरज पोलिसांनी शहराबाहेरील एका घराची कसून झडती घेतली. यावेळी प्रिंटर, स्कॅनर, तसेच छपाईसाठी वापरण्यात येणारे उच्च दर्जाचे कागद, शाई आणि नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे डिझाईन सॉफ्टवेअर त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या सर्व वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या असून बनावट नोटा वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी किंवा कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे. एकूण 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यात आल्या होत्या ज्यांची किंमत एक कोटी रुपयाहून अधिक होती.

याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, बनावट नोटांचा दर्जा उच्च प्रतीचा असल्याने बँकांमध्ये किंवा व्यापारी व्यवहारांमध्ये त्या सहजपणे प्रसारित केल्या जाऊ शकत होत्या. या छाप्या दरम्यान अटक करण्यात आलेल्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहे. या बनावट नोटा आणि पुरवठ्याचे जाळे कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत पसरले असल्याचा मिरज पोलीसांना संशय आहे. पोलीस या टोळीच्या मुख्य सूत्रधाराची व त्यांच्या साथीदारांची चौकशी करीत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर कडक पाळत ठेवण्यात आली असून सीमेवरील पोलीस स्थानकांमध्ये अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. चिकोडी, निपाणी, कागवाड पोलीस स्थानकांच्या हद्दीत चौकशी सुरू आहे. हल्ली डिजिटल प्रिंटरच्या मदतीने बनावट नोटा छापण्याचे प्रकार वाढीस लागले असून नोटा स्वीकारताना व्यापारी वर्गाने तसेच सर्वसामान्य जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *