

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बामनवाडी येथील शांताई वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील आजी आजोबांच्या सहवासात मनमुराद आनंद लुटला.
महिला व पुरुष अशा जवळपास 40 सभासदांनी गाणी गाऊन व नृत्य केले यावेळी वृध्दाश्रमातील आजींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सर्वच सभासद समरस झाले होते.डॉ. बी.जी.शिंदे यांनी गाजलेल्या शोले चित्रपटातील संवाद अभिनयासह सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. रविंद्र कुंभोजकर व मनिषा कुंभोजकर यांनी वैवाहिक जीवनाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल उभयतांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी एका छोटेखानी कार्यक्रमात सेवाभावी वृतीने काम करणारे शांताई वृध्दाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे व मारिया मोरे यांचा सत्कार अध्यक्ष विश्वास धुराजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजय मोरे यांनी वृध्दाश्रमातील अनेक अनुभव सांगितले यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के.एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, खजिनदार विनिता बाडगी, सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. विश्वास धुराजी, सदाशिव कुलकर्णी व विठ्ठल पोळ यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta