

कर्नाटक राज्य रयत संघटनेचा इशारा; बेळगाव निजलिंगाप्पा साखर कार्यालयात बैठक
निपाणी (वार्ता) : यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रति टन ४ हजार रुपये दिल्याशिवाय उसाचे कांडे तोडू देणार असल्याचा इशारा कर्नाटक रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. गुरुवारी बेळगाव येथील निजलिंगअप्पा साखर कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना आणि जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत काटामारी, यंदाच्या हंगामातील एफ आर पु प्रमाणे दर मिळावा, कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे वजन काटा बसवणे यासह विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीत प्रामुख्याने ऊसाला प्रतिटन ४०० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पण साखर कारखानदारांनी ३०५० ते ३१०० वरती कोणत्याही साखर दर देण्यास नकार दिला. त्यामुळे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शिवाय मागणी केलेला दर वमीळेपर्यंत पर्यंत साखर कारखाने सुरु न करण्याचा निर्णय रयत संघटनेने घेतला. यावेळी चुन्नापा पुजारी, शशिकांत पडसलगी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह प्रकाश नाईक, पांडू बिद्रोळी शंकराप्पा तोळमडी, वासू पंढरोळी, गोपाळ कोकणूर, कुमार मरडी सत्यपालपुरे, गुरुनाथ हुक्केरी, बाबासाहेब पाटील, कलगोंडा कोटगे, बबन जामदार, सर्जेराव हेगडे, विजय मंगावते, मल्लाप्पा अंगडी, एकनाथ सावदकर, सुनील पाटील, सागर पाटील, सचिन कांबळे, चिनू कुळवमोडे, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, मयूर पोवारौ यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta