Sunday , July 26 2026
Breaking News

पी.डी.ओ. यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावमध्ये निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : यरगट्टी तालुक्यातील माडमगेरी येथील पंचायत विकास अधिकारी (पी.डी.ओ.) यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य पंचायत विकास अधिकारी कल्याणकारी संघटनेने आज राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून आज संघटनेच्या वतीने बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा लागू व्हावा अशा आशयाची मागणी करणारे निवेदन बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत प्रशासनाला देण्यात आले आहे.
यरगट्टी तालुक्यातील माडमगेरी येथील पी.डी.ओ. जयगौडा पाटील यांच्यावर सात ते आठ जणांनी हल्ला केला होता परंतु हल्लेखोरांपैकी‌ केवळ चार जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यापूर्वी देखील संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रशासनांकडे निवेदन देऊन देखील याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. झालेल्या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्राम पातळीवर अशा प्रकारच्या घटना घडल्या जात असल्याचा आरोप देखील संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यावेळी केला आहे. पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी तातडीने विशेष कायदा लागू करणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यात सुधारणा करावी, अशी मागणी आनंद होळेण्णावर यांनी सरकारकडे केली आहे. यावेळी शिवकांत सी. एम., लीला मैत्री, आशा. एच.जी., प्रतिभा मुतालिक देसाई, उस्मान नदाफ यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील सर्व पंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *