Wednesday , March 4 2026
Breaking News

3500 रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यासाठी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटसमोर शेतकऱ्यांचे गेटबंद आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र राज्यात ऊसाला 3500 इतका दर निश्चित करण्यात आला आहे मात्र कर्नाटक राज्यात ऊसाला केवळ तीन हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटकात देखील 3500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि शेतकऱ्यांनी आज निजलिंगाप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे गेट बंद आंदोलन केले.
कारखानदार, शेतकरी तसेच प्रशासनाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आणि संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत गेट बंद आंदोलन सुरू केले.
आज कारखानदार आणि प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत केवळ पन्नास रुपयांचीच दरवाढ जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन छेडले असून महाराष्ट्र प्रमाणेच कर्नाटकात देखील ऊसाला दर देण्यात यावा किमान 3300 दर द्यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.
यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक यांनी सांगितले की, कर्नाटक सरकारने केवळ पन्नास रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमानच केला आहे. प्रशासनाची ही अन्यायकारक वागणूक शेतकरी कदापि सहन करणार नाहीत असा इशारा यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाही त्यांनी दिला व लवकरात लवकर योग्य दर जाहीर न झाल्यास शेतकरी व ऊस उत्पादकांकडून तीव्र आंदोलन उभारले जाईल.
कारखानदारांनी व प्रशासनाने ऊसदर ठरवीत असताना शेतमालाचा वाढता खर्च खतांच्या किमती हवामानाचा परिणाम त्याचप्रमाणे शेतमजुरी या सर्वांचा अभ्यास करून दर ठरवावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *