Thursday , March 5 2026
Breaking News

सीमाप्रश्नी कायदेशीर सल्लागारपदी आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारचे माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची सीमाप्रश्नी कायदेशीर सल्ला देण्यासाठी आणि सीमाप्रश्नाची सोडवणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी मदत करण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्यावतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महाराष्ट्र सरकारकडे साक्षीदारांच्या तयारीसाठी दाव्याची माहिती असलेले माजी महाभियोक्ता आशुतोष कुंभकोणी यांची वकिलांच्या पॅनेलवर नियुक्ती करावी अशी मागणी होती. महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून कुंभकोणी यांची लवकर नेमणूक करावी अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कुंभकोणी यांची सीमाप्रश्नी कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीचा निर्णय घेतला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *