
बेळगाव : दिनांक 28.10.2025 रोजी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी माहेश्वरी अंधशाळेत अभ्यास दौरा होता. तेथील विद्यार्थ्यांचे काम, शिकण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत, त्या विद्यार्थ्यातील शिस्त या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिल्या. अंधत्वावर मात करून शिकण्याची जिद्द मुलांमध्ये असते. याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली.
अभ्यासाबरोबरच मुले संगणक, बुद्धिबळ, क्रिकेट हे खेळ खेळतात. तबला, पेटी सुंदर वाजवतात. ब्रेल लिपीमुळे त्यांचं शिकणं, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिकणं, या सर्व गोष्टी मुलांनी बघितल्या.
अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, वर्गशिक्षिका
माया पाटील, स्नेहल बेळगावकर, शिक्षक दत्ता पाटील, श्वेता सुर्वेकर, अर्जुन गवस यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta