
बेळगाव : गेल्या महिन्यात 7 आणि 8 सप्टेंबर रोजी रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी येथे पार पडलेल्या कर्नाटक राज्य जूडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा हॉस्टेलचे खेळाडू तुकाराम लमाणी, वैभव पाटील, नेत्रा पत्रावळे, अंजली पाटील, दर्शन पाटील, धनुष्य एल. यांनी सुवर्णपदके जिंकून उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.
13/10/2025 रोजी बेळगाव येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन जूडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा हॉस्टेलच्या खेळाडू भूषण वनारसे, सौरभ पाटील, रोहन बी. एस., राधिका डुकरे, सायश्वरी कोडचवाडकर यांनी सुवर्णपदके पटकावून मध्यप्रदेशातील भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी पात्रता मिळवली आहे.
दिनांक 25 ते 27 ऑक्टोबर 2025 दरम्यान बेळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय जूडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा हॉटेलच्या खेळाडू — आसिमा सल्मानी, मेघना मुल्या, कावेरी सूर्यवंशी, आरती मुरकुटे, सहाना बेलगली, वैष्णवी भडांगे, वैभव पाटील, अंजली पाटील, श्लोक कातकूर, तेजस, श्रेयल कौरी — यांनी सुवर्णपदके जिंकून राजस्थान आणि मणिपूर राज्यांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.
दिनांक 27 व 28 ऑक्टोबर 2025 रोजी चित्रदुर्ग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पदवीपूर्व जूडो स्पर्धेत बेळगाव क्रीडा होस्टेलच्या खेळाडू स्पंदना, श्र्वेता अलकनूर, दिव्या पाटील, सोनालिका सी.एस., आफ्रिन बानू, संगमेश मडली, बसलिंगय्य अथनिमठ, धनुष्य एल., आर्यन डोंगले, चंद्रशेखरगौड, प्रथमेश पाटील यांनी सुवर्णपदके जिंकून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.
युवा सक्षमीकरण व क्रीडा विभागाचे उपसंचालक श्री बी. श्रीनिवास, जूडो प्रशिक्षक कु. रोहिणी पाटील आणि सौ. कुतुजा मुल्तानी तसेच कर्मचारी वर्गाने विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta