Thursday , March 5 2026
Breaking News

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : श्री सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित आज झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलचा इयत्ता आठविचा विद्यार्थी कु. राजू दोडमनी याने 14 वर्षाखालील गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच या विद्यार्थ्याने कुस्तीमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळविलेला आहे तर या विद्यार्थ्याची कुस्ती व गोळाफेकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या विद्यार्थ्याला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडाशिक्षक निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर तसेच शाळेचे सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *