
बेळगाव : गोवा धर्मप्रांताच्या सेवेत असलेले व मूळ संगरगाळी, ता. खानापूर येथील फादर कुस्तास लिमा, एस.जे. यांचे शुक्रवारी दुपारी गडहिंग्लज येथे निधन झाले. निधन समई फादर लिमा हे गडहिंग्लज येथील संत आंतोनी चर्च येथे धर्मगुरु म्हणून सेवेत होते. गडहिंग्लज येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
फादर लिमा हे एक लोकप्रीय ख्रिस्ती धर्मगुरु होते.
डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी धर्मगुरुपदाची दिक्षा घेतली होती व एक कार्यक्षम जेज्वीट पाद्री म्हणून त्यांनी आजरा, खानापूर, गडहिंग्लज तसेच खानापूर येथील आयटीआय मध्ये संचालक म्हणून सेवा बजावली होती. बेळगाव डायोसीजचे बिशप डॉ डेरीक फर्नांडीस, सेंट पॉल्सचे प्राचार्य फादर सायमन फर्नांडीस व अन्य धर्मगुरुंनी एका कार्यक्षम व सेवाभावी वरिष्ठ पाद्रीला ख्रिस्ती समाजाला मुकावे लागल्याने दुःख व्यक्त केले आहे. फादर लिमा यांचे पार्थीव रविवारी दि. ९ रोजी दुपारी २ वाजता फातिमा कॅथेड्रल येथे ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीची प्रार्थना फातिमा कॅथेड्रल येथे रविवारी दुपारी ३ वाजता आयोजीत करण्यात आली आहे. दफन विधी प्रार्थनेनंतर गोल्फ कोर्स शेजारील ख्रिस्ती दफनभुमीमध्ये अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta