Friday , March 6 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जोल्ले तर उपाध्यक्षपदी राजू कागे

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत जारकिहोळी पॅनेलला मोठे यश मिळाले आहे. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची नव्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली असून आमदार राजू कागे यांचीही उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

निवड प्रक्रिया आणि सभेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले व उपाध्यक्ष राजू कागे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. या प्रक्रियेदरम्यान आमदार भालचंद्र जारकिहोळी यांच्या कारमधूनच जोल्ले व कागे नामपत्र दाखल करण्यासाठी रवाना झाले, अशी माहिती समोर आली आहे.

बेळगाव डीसीसी बँकेतील निवडणूक ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत होती. अखेर जारकिहोळी पॅनेलने दोन्ही पदांवर निर्विवाद विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *