Sunday , September 20 2026
Breaking News

उचवडे (ता. खानापूर) येथे उद्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन

Spread the love

 

उचवडे : उचवडे ( ता. खानापूर) येथे बुधवार दि. 12 नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजता संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा खानापूर, बेळगाव आणि चंदगड तालुक्यातील भजनी मंडळासाठी खुली आहे.
या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रुपये 15000, द्वितीय क्रमांक रुपये 12000, तृतीय क्रमांक रुपये 10000 अशी एकूण 10 अकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट हार्मोनियम आणि उत्कृष्ट गायक यांनाही अकर्षक बक्षीसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
इच्छुक भजनी मंडळानी यास्पर्धेत भाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन विठ्ठल रखुमाई वारकरी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *