
बेळगाव : दिनांक १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यात आली. कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिरा अध्यक्ष राहुल कुरणे व प्रमुख उपस्थित मान्यवर अमित देसाई यांच्या हस्ते विशेष रुद्र अभिषेक कालभैरव स्तोत्र पठण केले. त्या नंतर विशेष पुषअर्चना करण्यात आली. तसेच यावेळी महिला सेवेकरी आणि उपस्थित महिलांकडून कालभैरव पाळणा पूजन व पारंपारिक पाळणा गायन करण्यात आले. त्यानंतर विशेष महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी मंदिराचे सर्व ट्रस्टी व मंदिरा चे सर्व सेवेकरी उपस्थित होत.
Belgaum Varta Belgaum Varta